आता 31 ऑगस्टनंतर देखील अनेक महिला या योजनेत अर्ज करण्यापासून वंचित राहिल्या होत्या. त्यामुळे सरकारने पुन्हा महिन्याभराची म्हणजेच 30 सप्टेंबरची मुदत वाढवली होती. या मुदतीतही असंख्य महिलांनी अर्ज भरले होते. त्यानंतरही अनेक महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलाच नव्हता. त्यामुळे सरकारने पुन्हा एकदा 15 ऑक्टोंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. ही मुदत शेवटची असेल याचे संकेत आधीच मिळत होते. कारण राज्यात विधानसभा निवडणूक लागणार होती. त्यामुळे सरकार मुदतवाढ देण्याची शक्यता कमी होती. आणि आता तसेच घडताना दिसतेय.
त्यामुळे ज्या महिला 15 ऑक्टोंबरपर्यंतही जर अर्ज करू शकल्या नाही आहेत. त्यांना मोठा धक्का बसला आहे.कारण त्यांच्या खात्यात एकही रूपया आला नाही. सरकारने आतापर्यंत पाच महिन्यांचा निधी म्हणजेच 7500 महिलांच्या खात्यात जमा केले आहेत. त्यामुळे ज्या महिला योजनेत अर्ज करू शकल्या नाहीयेत त्यांना मोठा धक्का बसला आहे.